Stree 2 Box Office Collection: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' बॉक्स ऑफिसवर जादू कायम, 600 कोटींचा टप्पा गाठणार
या हॉरर-कॉमेडीने 33 दिवसांत त्याच्या खर्चापेक्षा 915% अधिक कमाई केली आहे. इतकंच नाही तर आता तो रोज नवा विक्रमही करत आहे.
Stree 2 Box Office Collection: श्रध्दा कपूर आणि राजकूमार राव यांचा स्त्री २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या हॉरर-कॉमेडीने 33 दिवसांत त्याच्या खर्चापेक्षा 915% अधिक कमाई केली आहे. इतकंच नाही तर आता तो रोज नवा विक्रमही करत आहे. सोमवारी पाचव्या आठवड्यात या चित्रपटाने केवळ आमिर खानचा १५ वर्षांचा विक्रमच मोडला नाही तर शाहरुख खानच्या 'जवान'लाही मोडीत काढले आहे. स्त्री २ हा ६०० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला हिंदी चित्रपट बनणार आहे. पाचव्या आठवड्याच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, शुक्रवारी ३.६० कोटी, शनिवारी ५.५५ कोटी, रविवारी ६.८५ कोटी आणि सोमवारी ३.१७ कोटी रुपयांचे कलेक्शन झाले. एकूणच, आतापर्यंत या चित्रपटाने 583.35 कोटी रुपयांचा जबरदस्त व्यवसाय केला आहे. (हेही वाचा- सोहम शाहच्या 'तुंबाड' या चित्रपटाने केला तीन दिवसांत 7 कोटींहून अधिकचा व्यवसाय)
'स्त्री 2'ची बॉक्स ऑफिसवर कमाई
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)