Sharvari Wagh in Breathtaking Black Gown: अवॉर्ड फंक्शनमध्ये शर्वरी वाघने परिधान केला ब्लॅक गाउन; ग्लॅमरस लूक पाहून चाहते घायाळ (See Photos)
शर्वरीचे इतर फोटो पाहता तिच्या पोशाखांची निवड, स्टाईलिंग आणि नैसर्गिक सौंदर्याने तिला स्टायलिश सेलिब्रिटींपैकी एक म्हणून स्थान मिळवून दिले असल्याचे दिसून येते. शर्वरी वाघ ही बॉलिवूडमधील एक नवोदित आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे, जी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
अभिनेत्री शर्वरी वाघ ही मुंज्या चित्रपटानंतर घराघरात प्रसिद्ध झाली. शर्वरी तिच्या सोशल मिडिया उपस्थितीमुळेही नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो, व्हिडीओ, स्टाईल, फॅशन इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. सध्या पिंकव्हिला स्क्रीन अँड स्टाईल अवॉर्ड्स 2025 मधील तिच्या गाऊनची चर्चा आहे. यावेळी शर्वरीने डिझायनर गौरव गुप्ता यांनी बनवलेला एक आकर्षक रफल वेव्ह कॉलम गाऊन परिधान केला होता. अतिशय ग्लॅमरस अशा या गाऊनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हा एक काळा क्रेप कॉलम गाऊन होता. हा गाऊन मुख्य आकर्षण ठरू शकेल म्हणून शर्वरीने खूप कमी अॅक्सेसरीज घातल्या होत्या. तसेच या लुकसाठी तिने जाणूनबुजून भडक किंवा उठावदार मेकअप टाळला, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीन भर पडली.
शर्वरीचे इतर फोटो पाहता तिच्या पोशाखांची निवड, स्टाईलिंग आणि नैसर्गिक सौंदर्याने तिला स्टायलिश सेलिब्रिटींपैकी एक म्हणून स्थान मिळवून दिले असल्याचे दिसून येते. शर्वरी वाघ ही बॉलिवूडमधील एक नवोदित आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे, जी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. 2024 मधील मुंज्या या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने तिला खरी मिळवून दिली. मराठी लोककथेवर आधारित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. ती एक एक प्रशिक्षित नृत्यांगना आणि कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट धारकही आहे. तिची ही बहुश्रुतता तिला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी ठरवते. (हेही वाचा: Prajakta Mali Saree Photos: लाल रंगाची नऊवारी साडी आणि पारंपारिक दागिन्यांमध्ये खुलले प्राजक्ता माळीचे सौंदर्य; नवे फोटोशूट व्हायरल)
Sharvari Wagh in Breathtaking Black Gown:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)