Priyanka Chopra: प्रियंका चोप्राच्या चेहऱ्यावरची जखम पाहून चाहते नाराज, म्हणाले- ठीक आहेस ना?
तिचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेक चाहते नाराज झाले आणि त्यांनी कमेंट बॉक्समध्येच तिची तब्येत विचारण्यास सुरुवात केली. अभिनेत्री प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर खूप सूज आहे, तर तिच्या ओठ आणि नाकाजवळ रक्तही दिसत आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) लग्नानंतर परदेशात स्थायिक झाली असली तरी सोशल मीडियाच्या (Social Media0 माध्यमातून ती नेहमीच चर्चेत असते. प्रियांकाने तिच्या उत्कृष्ट स्टायलिश लूकसाठी खूप प्रशंसा मिळवली, परंतु यावेळी प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा चेहरऱ्याला रक्त लागलेले दिसत आहे. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेक चाहते नाराज झाले आणि त्यांनी कमेंट बॉक्समध्येच तिची तब्येत विचारण्यास सुरुवात केली. अभिनेत्री प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर खूप सूज आहे, तर तिच्या ओठ आणि नाकाजवळ रक्तही दिसत आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, 'कामावर तुमचा दिवस खूप कठीण गेला आहे का?' यासोबतच तिने हसणारा इमोजीही शेअर केला आहे. ज्यावरून प्रियांका चोप्राचा हा फोटो शूटदरम्यान काढण्यात आल्याचे समजते. प्रियांका लवकरच हॉलिवूड अभिनेता मॅक अँथनीसोबत एंडिंग थिंग्ज या चित्रपटात दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांकाचा हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर असणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)