Satyameva Jayate 2 Trailer: सत्यमेव जयते 2 चा ट्रेलर प्रदर्शित; Salman Khan कडून John Abraham चं कौतुक करत 'अंतिम' सोबत बॉक्सऑफिसवर टक्कर देणार्‍या सिनेमाला शुभेच्छा

सलमान खानचा 'अंतिम' आणि जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते 2' या सिनेमाची बॉक्सऑफिसवर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटाला टक्कर होणार आहे. कोविड 19 संकटानंतर आता पुन्हा सिनेमागृहं सुरू झाल्याने अनेक बिग बजेट सिनेमे एका पाठोपाठ रिलीज करण्याकडे कलाकार, निर्मात्यांचं लक्ष असणार आहे.

Satyameva Jayate 2 Trailer

John Abraham चा आगामी Satyameva Jayate 2 सिनेमाचा ट्रेलर  आज (25 ऑक्टोबर) लॉन्च  करण्यात आला आहे. 25 नोव्हेंबरला हा सिनेमा  चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर 26 नोव्हेंबरला सलमान खानचा 'अंतिम' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सलमान खानने आज  ट्वीटरच्या माध्यमातून 'सत्यमेव जयते 2' च्या ट्रेलरचं कौतुक करत जॉन सह सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 'सत्यमेव जयते 2'  25 नोव्हेंबरला तर सलमान खानची प्रमुख असलेला आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित 'अंतिम' 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

सत्यमेव जयते 2 ट्रेलर  

सलमान खान ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now