अक्षयच्या 'वेलकम टू जंगल' मधून संजय दत्तची माघार; आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे घेतला निर्णय
संजय दत्तने मुंबईतील मड आयलंडमध्ये फक्त एक दिवस शूटिंग केलं आणि या चित्रपटाला रामराम ठोकला.
अक्षय कुमारच्या 'वेलकम टू जंगल'ची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. या मल्टीस्टारर चित्रपटाचं पोस्टर आणि बिहाइंड द सीन व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये दिशा पटानी, रवीना टंडन, श्रेयस तळपदे या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटात संजय दत्तही असणार असल्याची बातमी होती. संजय दत्तने 'वेलकम टू जंगल' हा हा चित्रपट सोडला आहे. या चित्रपटात तो अक्षय कुमारसोबत काम करणार नाहीये. आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे त्यांने हा निर्णय घेतला आहे. एका सूत्राने सांगितले की, संजय दत्तने मुंबईतील मड आयलंडमध्ये फक्त एक दिवस शूटिंग केलं आणि या चित्रपटाला रामराम ठोकला.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)