Salman Khan केले महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी मतदान; सुरक्षारक्षकांच्या गराड्यात पोहचला बुथ वर (Watch Video)
वांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरी स्कूल मध्ये सलमान खानने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
बॉलिवूड मधील दबंगस्टार सलमान खान आज वांद्रे पश्चिम मध्ये Mount Mary School मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संध्याकाळी पोहचला. बिष्णोई गॅंगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने सध्या त्याच्यासोबत हाय टेक सुरक्षा व्यवस्था असते. आज मतदान करताना सलमान आला असताना तो सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात पहायला मिळाला. त्याच्यासोबत असलेल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये ड्रोनचा समावेश असल्याचं पहायला मिळालं आहे.
सलमान खान ने बजावला मतदानाचा हक्क
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)