Saif Ali Khan Attack Case: अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी हल्ला करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला पकडण्यासाठी अनेक पोलीस पथके तैनात करण्यात आली होती. काल संशयित वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ दिसला होता. तांत्रिक डेटा आणि एका गुप्तचराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला पकडले. त्याला वांद्रे पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, तेथे संशयिताची चौकशी करण्यात येत आहे. तपासणीदरम्यान, आरोपीचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. आता ज्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे, त्याची उंची आणि बांधणी हुबेहूब सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या आरोपींसारखी आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. ही व्यक्ती कोण आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
बुधवारी पहाटे साधारण 2 वाजता एका चोराने सैफच्या घरात घुसून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत सैफ 6 ठिकाणी जखमी झाला आहे. त्याच्या पाठीच्या कण्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली होती, त्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अभिनेता आता धोक्याबाहेर आहे. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. (हेही वाचा: Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने मागितले होते 1 कोटी रुपये; कर्मचारी नर्सने कथन केली त्यावेळी घडलेली धक्कादायक घटना)
Saif Ali Khan Attack Case-
#WATCH | Saif Ali Khan Attack Case | Mumbai Police bring one person to Bandra Police station for questioning.
Latest Visuals pic.twitter.com/us4CYR7BR1
— ANI (@ANI) January 17, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)