Ram Gopal Varma: सुप्रसिध्द दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या जीवाला धोका, रामगोपाल वर्मा यांचं सुचक ट्विट

एस एस राजामौली तुम्ही कृपया तुमची सुरक्षा वाढवा कारण भारतात चित्रपट निर्मात्यांचा एक समूह घातपातातून तुमची हत्या करण्याचा कट रचत आहेत, अशा आशयाचं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी एस एस राजामौली यांच्या बाबत केलं आहे.

बॉलिवूडचे सुप्रसिध्द निर्माते आणि दिग्दर्शक यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी दक्षिणात्य सिनेमांचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या जीवाला धोका असण्याचा दावा केला आहे. रामगोपाल वर्मा यांनी ट्विटमध्ये लिहलयं, एस एस राजामौली तुम्ही कृपया तुमची सुरक्षा वाढवा कारण भारतात चित्रपट निर्मात्यांचा एक समूह घातपातातून तुमची हत्या करण्याचा कट रचत आहेत. तरी तुमचे सतत सुपर हिट ठरत असलेले सिनेमांच्या ईर्षे पोटी हे कट रचण्यात येत आहेत. तरी तुम्हाला संपवण्याचा कट आखणाऱ्या निर्मात्यांमध्ये मी देखील सहभागी आहे पण मी ४ पेग डाऊन असल्याने मी हे ट्विट करत आहे. आता रामगोपाल वर्मा यांनी केलेलं हे ट्विट उपहासातून केलं आहे की मिश्कील पण याची जराही कल्पना नसली तरी बॉलिवूडसह दक्षिणात्य सिनेमांमध्ये रामगोपाल वर्मांच्या या ट्विटची जोरदार चर्चा होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now