Tere Ishq Mein Teaser: 'रांझना' 10 वर्षांनंतर परतला, धनुषच्या नव्या हिंदी चित्रपटाची घोषणा; पहा 'तेरे इश्क में'ची पहिली झलक
2013 साली प्रदर्शित झालेला 'रांझना' (Raanjhna) हा चित्रपट इतका सुपरहिट ठरला की आजही त्याच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.
साऊथचा सुपरस्टार धनुष (Dhanush) पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू हिंदी प्रेक्षकांवर खेळवायला येत आहे. यावेळी तो कोणता प्रोजेक्ट सादर करणार आहे, हे समजल्यानंतर त्याच्या चित्रपटाची वाट पाहणे लोकांना कठीण होणार आहे. वास्तविक, धनुष लवकरच त्याच्या सुपरहिट चित्रपट 'रांझना'चा सिक्वेल 'तेरे इश्क में'मध्ये (Tere Ishq Mein) दिसणार आहे. 2013 साली प्रदर्शित झालेला 'रांझना' (Raanjhanaa) हा चित्रपट इतका सुपरहिट ठरला की आजही त्याच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. आता 21 जून रोजी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी धनुष आणि दिग्दर्शक आनंद एल राय (Anand L Rai) यांनी पुन्हा एकदा हातमिळवणी केली आहे. आपल्या चित्रपटाची घोषणा करताना राय यांनी धनुषचे पात्र 'रांझना'मधील कुंदनशी जोडले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)