Poacher: अभिनेत्री आलिया भट्टचं वेब सीरीजमध्ये पदार्पण; पोचर 'या' दिवशी प्रदर्शित
पोचर नावाची नवी वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Poacher: अभिनेत्री आलिया भट्ट आता एका नव्या वेब सिरीज संदर्भात चर्चेत आहेत. पोचर नावाची नवी वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 23 फेब्रुवारीला ही वेब सिरीज पाहता येणार आहे. ही वेब सीरिज सत्य घटनांवर आधारित आहे. जे भारतीय इतिहासात देखील मांडले आहे. या क्राईम सीरिजमध्ये भारतातील बेकायदेशीर हस्तिदंत शिकार व्यापाराचा शोध घेण्यात आला आहे. एमी अवॉर्ड विजेते रिची मेहता यांनी या चित्रपटाची निर्मीती केली असून दिग्दर्शनही केले आहे. या मालिकेत निमिषा सजयन, रोशन मॅथ्यू आणि दिव्येंदू भट्टाचार्य यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. ट्रेलरमध्ये दिसल्याप्रमाणे, आलिया एका १० वर्षाच्या हत्तीचा खूनाचा तपास करत आहे. ट्रेलरमध्ये बराच सस्पेन्स आहे, ही सीरीज प्राईम अॅमेझॉनवर प्रेक्षकांना पाहता येणार. हेही वाचा- आधी माईक मारला.., मग फोन हिसकावून फेकला; आदित्य नारायणने लाईव्ह कॉन्सर्टमध्ये केले चाहत्याशी गैरवर्तन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)