Parineeti Chopra-Raghav Chadha Wedding Video: परिणीती चोप्राने ट्विटरवर शेअर केला लग्नाचा खास व्हिडिओ, पहा

या व्हिडिओला तिने To my husband... असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा ऑफ-व्हाइट रंगाचा लेहेंगा आणि हिरव्या कुंदन-डायमंड ज्वेलरीमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये परिणीती आणि राघव चढ्ढा खूपच क्यूट दिसत आहेत.

Parineeti Chopra-Raghav Chadha Wedding Video (PC -Twitter)

Parineeti Chopra-Raghav Chadha Wedding Video: राधव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाला बरेच दिवस उलटून गेले आहेत. या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. या लग्नाशी संबंधित छायाचित्रे, व्हिडिओज कधी समोर येतील याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. हा विवाह अत्यंत गुप्त पद्धतीने पार पडला, त्यामुळे या संपूर्ण सोहळ्याची छायाचित्रे लीक होऊ नयेत यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, नंतर अभिनेत्री परिणीती चोप्राने स्वतः या भव्य लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. आता परिणीतीने ट्विटरवर लग्नाचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने To my husband... असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा ऑफ-व्हाइट रंगाचा लेहेंगा आणि हिरव्या कुंदन-डायमंड ज्वेलरीमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये परिणीती आणि राघव चढ्ढा खूपच क्यूट दिसत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement