Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding: राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा 23-24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये विवाहबद्ध होणार
परिणीती आणि राघव यांनी लग्नासाठी उदयपूरचे सितारा हॉटेल बुक केले आहे. त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम लीला पॅलेस आणि उदयविलास हॉटेलमध्ये होणार आहे.
बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राघव आणि परिणीती सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लग्नगाठ बांधणार आहेत. राघव आणि परिणीती यांचे लग्न 23 आणि 24 सप्टेंबरला होणार आहे. 22 तारखेपासून पाहुण्यांचे आगमन सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 23 सप्टेंबरपासून मेहंदी, हळदी आणि संगीताचे कार्यक्रम सुरू होतील. परिणीती आणि राघव यांनी लग्नासाठी उदयपूरचे सितारा हॉटेल बुक केले आहे. त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम लीला पॅलेस आणि उदयविलास हॉटेलमध्ये होणार आहे.
पाहा परिणीतीची पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)