Criminal Justice 3 Teaser: पंकज त्रिपाठी आपल्या जुन्या शैलीत एक नवीन केस लढताना दिसणार, 'क्रिमिनल जस्टिस' टीझर लाँच
यात श्वेता बसू प्रसादही वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. मालिकेत पंकज आणि श्वेता वकिलाच्या भूमिकेत समोरासमोर दिसत आहेत.
पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) स्टारर वेब सीरिज 'क्रिमिनल जस्टिस'च्या (Criminal Justice 3) तिसऱ्या सीझनचा टीझर लाँच झाला आहे. त्याचा टीझर सस्पेन्सने भरलेला आहे. पंकज त्रिपाठी आपल्या जुन्या शैलीत एक नवीन केस लढताना दिसत आहेत. या मालिकेत पंकज वकील माधव मिश्रा यांची भूमिका साकारत आहे. टीझरची सुरुवात माधवच्या घरापासून होते, जिथे एक महिला अवंतिका त्याच्याकडे मदत मागण्यासाठी जाते. यानंतर कोर्टरूमची एक झलक दाखवण्यात आली आहे. यात श्वेता बसू प्रसादही वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. मालिकेत पंकज आणि श्वेता वकिलाच्या भूमिकेत समोरासमोर दिसत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)