Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पुन्हा एकदा ओंकार भोजनेची एँट्री, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले अब आएगा मज्जा
ओंकार यापुढे प्रत्येक एपिसोडमध्ये दिसेल की फक्त या दिवाळी स्पेशल एपिसोडसाठी आला आहे, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमध्ये ओंकार भोजने परतणार आहे. सोनी मराठीकडून एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यातून ओंकार पुन्हा शोमध्ये दिसणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. ओंकार हास्यजत्रेत पुन्हा दिसणार हे कळताच चाहते व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत. ओंकार भोजने येत्या शनिवार व रविवारच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. ओंकार यापुढे प्रत्येक एपिसोडमध्ये दिसेल की फक्त या दिवाळी स्पेशल एपिसोडसाठी आला आहे, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)