‘Nadaaniyan’ First Look: इब्राहिम अली खानचा डेब्यू चित्रपट 'नादानियां' चा फर्स्ट लूक समोर, लवकरच होणार नेटफ्लिक्सवर प्रदर्शित (See Post)
नवोदित अभिनेता इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या 'नादानियां' चित्रपटाचा फर्स्ट लूक नेटफ्लिक्सने प्रदर्शित केला आहे. ज्यामुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. करण जोहर निर्मित चित्रपटाचे कथानक अद्याप समजू शकलेले नाही.
‘Nadaaniyan’ First Look: इब्राहिम अली खान(Ibrahim Ali Khan) आणि खुशी कपूर ( Khushi Kapoor) यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'नादानियां'चा बहुप्रतिक्षित पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. ३१ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या लूकमध्ये इब्राहिम स्वेटशर्ट आणि शॉर्ट्समध्ये कॅज्युअलमध्ये दिसतो तर खुशी त्याच्यासोबत पार्कमध्ये आरामदायी क्षण घालवताना दिसते. शौना गौतम दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित चित्रपटाबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे चाहते अधिक उत्सुकतेने चित्रपटाची वाट पाहत आहेत.
'नादानियां' चा फर्स्ट लूक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)