Manoj Kumar Passes Away: ‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन

त्यांचे नाव हरिकृष्ण गोस्वामी होते आणि त्यांचा जन्म 1937 मध्ये अबोटाबाद येथे झाला, जो आता पाकिस्तानात आहे. मनोज कुमार यांनी इतके देशभक्तीपर चित्रपट केले आणि ते इतके हिट झाले की त्यांचे नाव 'भारत कुमार' पडले.

Manoj Kumar

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वैद्यकीय अहवालानुसार, त्यांचे निधन कार्डियोजेनिक शॉकमुळे झाले, जे एका गंभीर हृदयविकाराच्या झटक्यामुळे (एक्यूट मायोकार्डियल इन्फ्रक्शन) उद्भवले. त्यांच्या निधनाने बॉलीवुडमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची आणि माध्यमांची गर्दी जमली आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल अद्याप अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. 1992 मध्ये त्यांना पद्म श्री आणि 2015 मध्ये दादासाहेब फाल्के पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, जे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ते ओळखले जायचे. क्रांती, उपकार, शहीद, पूर्व और पश्चिम, रोटी कपडा और मकान हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट. त्यांचे नाव हरिकृष्ण गोस्वामी होते आणि त्यांचा जन्म 1937 मध्ये अबोटाबाद येथे झाला, जो आता पाकिस्तानात आहे. मनोज कुमार यांनी इतके देशभक्तीपर चित्रपट केले आणि ते इतके हिट झाले की त्यांचे नाव 'भारत कुमार' पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. (हेही वाचा: Rakesh Pandey Passes Away: ज्येष्ठ अभिनेते राकेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

Manoj Kumar Passes Away:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement