Legal Notice To Diljit Dosanjh: गायक दिलजीत दोसांझला चाहतीने पाठवली कायदेशीर नोटीस; Dil-Luminati शोच्या तिकीट विक्री प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचा आरोप
कायदेशीर नोटीसमध्ये, तिने तिकीट विक्री प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचा आणि आयोजकांवर ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. रिद्धिमा कपूर असे या चाहतीचे नाव असून, ती दिल्लीची लॉची विद्यार्थिनी आहे.
Legal Notice To Diljit Dosanjh: पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या (Diljit Dosanjh) गाण्यांची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. त्याने आपल्या आवाजाने भारतातच नव्हे तर जगभरात खूप नाव कमावले आहे. आजकाल, दिलजीत त्याच्या ' दिल-लुमिनाटी' शोसाठी (Dil-Luminati Show) चर्चेत आहे, जो 26 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू होईल. या कार्यक्रमाच्या तिकिटासाठी चाहत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. आता दिलजीतच्या एका हताश झालेल्या चाहत्याने त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. दिलजीतच्या दिल-लुमिनाटी शोसाठी तिकीट न मिळाल्याने ही कायदेशीर नोटीस पाठवली गेली आहे. कायदेशीर नोटीसमध्ये, तिने तिकीट विक्री प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचा आणि आयोजकांवर ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. रिद्धिमा कपूर असे या चाहतीचे नाव असून, ती दिल्लीची लॉची विद्यार्थिनी आहे.
नोटीसमध्ये तिने म्हटले आहे की, आयोजकांनी 12 सप्टेंबर, दुपारी 1 वाजता, कार्यक्रमासाठी बुकिंग सुरू होण्याची वेळ जाहीर केली असली तरी, हे पास 12:59 वाजता लाईव्ह झाले, ज्यामुळे शेकडो चाहत्यांनी एका मिनिटात तिकिटे बुक केली. अर्ली-बर्ड पास मिळवण्यासाठी तिने एचडीएफसी क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले. तिच्या खात्यातून पैसे कापले गेले, मात्र तिला पास मिळू शकले नाहीत. नंतर ती रक्कम परत करण्यात आली. यानंतर रिद्धिमाने झोमॅटो, एचडीएफसी बँक आणि सारेगामा प्रायव्हेट लिमिटेड यांनाही कायदेशीर नोटीस पाठवली. (हेही वाचा: Bollywood Movie : महाराजनंतर जुनैद खानचा दुसरा चित्रपट खुशी कपूरसोबत; जाणून घ्या चित्रपटाची अपडेट्स)
गायक दिलजीत दोसांझला चाहतीने पाठवली कायदेशीर नोटीस-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)