Lata Mangeshkar Funeral: लता मंगेशकर यांचा अंतिम प्रवास; गानकोकिळेला निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कवर चाहत्यांची अलोट गर्दी (Watch Video)
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले.
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. आपल्या आवाजाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या या महान गायिकेचा अंतिम प्रवास सुरु झाला आहे. लता मंगेशकर यांच्यावर मुंबईच्या शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे निवासस्थान प्रभुकुंजवरून त्यांची अंत्ययात्रा सुरु झाली असून, लवकरच त्यांचे पार्थिव शिवाजी पार्कवर पोहोचणार आहे. शिवाजी पार्क येथे त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल तसेच महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)