Kartik Aaryan Is Part of Hera Pheri 3: 'हेरा फेरी 3' मध्ये कार्तिक आर्यन दिसणार मुख्य भूमिकेत, परेश रावल यांनी या बातमीला दिला दुजोरा (ट्विट पहा)
दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे. कार्तिक आर्यन हेरा फेरी 3 चा भाग असणार आहे. या वृत्ताला परेश रावल यांनी दुजोरा दिला आहे.
'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar), सुनील शेट्टी (Sunil Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि जबरदस्त कॉमिक टायमिंगने सर्वांची मने जिंकली आहेत. आता त्याचा तिसरा भागही येणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे. कार्तिक आर्यन हेरा फेरी 3 चा भाग असणार आहे. या वृत्ताला परेश रावल यांनी दुजोरा दिला आहे. एका ट्विटर यूजरने परेश रावलला विचारले होते, सर, कार्तिक आर्यन (Kartik Aryan) 'हेरा फेरी 3' करत आहे हे खरे आहे का? याला उत्तर देताना परेश रावल यांनी लिहिले, होय, हे खरे आहे.
ट्विट पहा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)