Jaane Jaan Teaser: करीना कपूर आणि विजय वर्मा यांच्या 'जाने जान'चा टीझर प्रदर्शित; 'या' खास दिवशी प्रदर्शित होणार अभिनेत्रीचा पहिला OTT चित्रपट
तसेच, या चित्रपटाद्वारे करीना ओटीटी पदार्पण करणार आहे. जी तिच्या चाहत्यांसाठी तिच्या वाढदिवशी भेट असेल. हा चित्रपट 21 सप्टेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.
Jaane Jaan Teaser: करीना कपूरच्या 'जाने जान' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. OTT वर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात करीना व्यतिरिक्त विजय वर्मा आणि जयदीप अहलावत सारखे उत्कृष्ट कलाकार आहेत. अलीकडेच या चित्रपटाचा टीझर करीना कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. पहिल्या झलकमध्ये संपूर्ण सस्पेन्स आणि थ्रिलरचा मिलाफ पाहायला मिळतो. तसेच, या चित्रपटाद्वारे करीना ओटीटी पदार्पण करणार आहे. जी तिच्या चाहत्यांसाठी तिच्या वाढदिवशी भेट असेल. हा चित्रपट 21 सप्टेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी करीना कपूरचाही वाढदिवस आहे. या खास दिवशी करीना OTT डेब्यू करून चाहत्यांना गिफ्ट देणार आहे. जे चाहत्यांसाठीही खूपचं रोमांचक असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)