Housefull 5 Box Office Collection Day 2: अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5' चित्रपटाची दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमाई; 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील

अक्षय कुमार स्टारर 'हाऊसफुल 5' चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या मल्टीस्टारर चित्रपटाने भारतात 24 कोटी आणि जगभरात 40 कोटींच कलेक्शन केल आहे.

PC-X

Housefull 5 Box Office Collection Day 2: अक्षय कुमार स्टारर 'हाऊसफुल 5' (Housefull 5 )चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या मल्टीस्टारर चित्रपटाने भारतात 24 कोटी आणि जगभरात 40 कोटींच कलेक्शन केल आहे. दुसरीकडे, शनिवारी, म्हणजेच दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने 30 कोटींची कमाई केली. ज्यामुळे चित्रपटाची एकूण कमाई 54 कोटींवर पोहोचली. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, शनिवारी चित्रपटाने सरासरी 33.18 कोटींची नोंद केली.

हाऊसफुल 5 चे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे आणि नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट निर्मित आहे. या चित्रपटात रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, श्रेयस तळपदे, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, डिनो मोरिया, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंग, सौंदर्या शर्मा, चंकी डी नीरहे, चंकी लेहेर आणि जॉन्की लेयर यांच्याही भूमिका आहेत.

'हाऊसफुल 5' चा ट्रेलर पहा:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement