Gururaj Jois Dies: सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस यांचे वयाच्या 53 व्या वर्षी निधन; Mission Istanbul, Zanjeer सारख्या चित्रपटांमध्ये केले होते काम

सिनेमॅटोग्राफर अनिल मेहता यांचा सहाय्यक म्हणून चित्रपटसृष्टीतील गुरुराज यांचा प्रवास 'लगान'च्या निर्मितीदरम्यान सुरू झाला.

Gururaj Jois Dies

कॅमेरामन गुरुराज जोइस यांचे काल (27 नोव्हेंबर) सकाळी बंगळुरू येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 53 वर्षांचे होते आणि त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मूल आहे. गुरुराज यांनी अपूर्व लखिया यांनी बनवलेल्या बहुतेक चित्रपटांचे छायांकन केले होते. गुरुराज आणि अपूर्व यांची भेट लगानच्या सेटवर झाली, तेव्हा गुरुराज सिनेमॅटोग्राफर अनिल मेहता यांचे सहाय्यक होते, तर अपूर्वने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना सहाय्य केले होते. गुरुराज यांनी ‘मुंबई से आया मेरा दोस्त’, ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’, ‘मिशन इस्तंबूल’, ‘एक अजनबी’, ‘जंजीर’, ‘गली गली चोर है’ अशा अनेक चित्रपटांचे छायांकन केले होते. सिनेमॅटोग्राफर अनिल मेहता यांचा सहाय्यक म्हणून चित्रपटसृष्टीतील गुरुराज यांचा प्रवास 'लगान'च्या निर्मितीदरम्यान सुरू झाला. आमिर खान प्रॉडक्शनने गुरूराज जोईस यांच्या निधनाबाबत तीव्र दु:ख आणि शोक व्यक्त केला आहे. (हेही वाचा: Famous Designer On Ventilator: सेलिब्रिटी फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती चिंताजनक, दिल्लीच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु - रिपोर्ट्स)

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now