Goldy Brar Threatens to Kill Salman Khan: गँगस्टर गोल्डी ब्रारची सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

सलमान खानच्या हत्येबद्दल गँगस्टरने बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी, अभिनेत्याने मुंबई पोलिसांना गोल्डी ब्रारकडून धमकीचा मेल आल्याची माहिती दिली होती.

Salman Khan (Photo Credit - Facebook)

कॅनडामध्ये राहणारा वाँटेड गँगस्टर गोल्डी ब्रार याने पुन्हा एकदा बॉलिवूडचा दबंग सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी दिली असून मुलाखतीदरम्यान ही धमकी देण्यात आली आहे. तो म्हणाला की, सलमान खान त्याच्या हिटलिस्टमध्ये आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी वाँटेड गोल्डीने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. सलमान खानच्या हत्येबद्दल  गँगस्टरने बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी, अभिनेत्याने मुंबई पोलिसांना गोल्डी ब्रारकडून धमकीचा मेल आल्याची माहिती दिली होती. गोल्डी ब्रार म्हणाला, सलमान खानने बिश्नोई समाजाचा अपमान केला आहे. काळवीटाची शिकार केली. ज्याप्रमाणे हिंदू गीतेला पवित्र मानतात, शीख गुरु ग्रंथाला पवित्र मानतात, त्याचप्रमाणे बिष्णोई समाज काळवीट मानतो. त्याचवेळी गोल्डीने सांगितले की, जोपर्यंत तो (सलमान खान) माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hindustan Times (@hindustantimes)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now