Sonu Nigam: प्रसिद्ध गायक सोनू निगमला कोरोनाची लागण, कुटुंबही कोरोनाच्या विळख्यात

या व्हिडिओमध्ये तो स्वत: कोरोना व्हायरसची लागण झाल्याबद्दल सांगत आहे.

Sonu Nigam (Photo Credits: Instagram)

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) कहर सुरू आहे. कोविड ओमिक्रॉनचे नवीन प्रकार वेगाने पसरत आहे. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाचा फटका बसला आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) देखील कोरोनाच्या विळख्यात (Corona Positive) आला आहे. केवळ सोनूच नाही तर त्याचे कुटुंबही यात अडकले आहे. सोनूचा मुलगा, त्याची पत्नी आणि वहिनी या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द सोनू निगमने सोशल मीडियावर ही माहिती दिली. सोनू निगमने बुधवारी त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो स्वत: कोरोना व्हायरसची लागण झाल्याबद्दल सांगत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)