Diljit Dosanjh स्टारर 'Jogi'चा दमदार Trailer रिलीज, 1984 च्या दंगलीवर आधारित चित्रपट

या चित्रपटात दिलजीतसोबतच कुमुद मिश्रा, मोहम्मद झीशान अय्युब, अमायरा दस्तूर आणि हितेन तेजवानी या कलाकांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

Diljit Dosanjh स्टारर 'Jogi'चा दमदार Trailer रिलीज, 1984 च्या दंगलीवर आधारित चित्रपट
Jogi Trailer (Photo Credit - Twitter)

दिलजीत दोसांझ स्टारर 'जोगी' या चित्रपटाचा ट्रेलर आज म्हणजेच मंगळवारी रिलीज झाला आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट 16 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे, जो 84 च्या दिल्ली दंगलीच्या आधारावर आहे. या चित्रपटाची कथा तीन दिवस चाललेल्या दंगलीत स्वत:च्या आणि कुटुंबाच्या जीवासाठी लढणाऱ्या तीन मित्रांवर आधारित आहे. दिलजीत दोसांझ स्टारर या चित्रपटाचा ट्रेलर 84 च्या दंगलीची आठवण करून देणारा, बघायला खूप भयावह वाटतो. दंगली दरम्यान झालेली हिंसा आणि लोकांना होणारा त्रास याचं दृष्य ट्रेलरमध्ये दिसत आहे. या चित्रपटात  दिलजीतसोबतच कुमुद मिश्रा, मोहम्मद झीशान अय्युब, अमायरा दस्तूर आणि हितेन तेजवानी या कलाकांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 30, 2022 06:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).