Suhani Bhatnagar Passed Away: दंगल फेम अभिनेत्री 'सुहानी भटनागर' हीच निधन, वयाच्या 19 वर्षी घेतला शेवटचा श्वास
दंगल फेम अभिनेत्री सुहानी भटनागर हीचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. तिच्या मृत्यू माहिती मिळताच, चित्रपट सृष्टीत एकच शोककळा पसरली आहे.
Suhani Bhatnagar Passed Away: दंगल फेम अभिनेत्री सुहानी भटनागर हीचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. तिच्या मृत्यू माहिती मिळताच, चित्रपट सृष्टीत एकच शोककळा पसरली आहे. अवघ्या 19 व्या वर्षी सुहानीने प्राण सोडले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुहानीचे फरिदाबाद येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते दरम्यान तिला औषधोपचारामुळे रिअॅक्शन झालं आणि शरिरात पाणी साचलं आणि तिचा मृत्यू झाला. उपचारा दरम्यानच तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सुहानीने दंगल चित्रपटातून सिनेमा सृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात तीनं छोट्या बबीताची भुमिका निभावली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)