Parineeti Chopra And Raghav Chadha: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाच्या स्वागतासाठी उदयपुर शहर सजले, उद्या अडकणार विवाहबंधनात

शहरात देखील विविध ठिकाणी त्यांच्या लग्नाचे बॅनर्स पहायला मिळत आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा (Actress Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) काही दिवसांतच विवाहबंधनात अडकणार आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये सात फेरे घेतील. सध्या त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी या दोघांचे आज उदयपुरमध्ये आगमन होणार आहे. त्यांच्या आगमनासाठी उदयपुर शहर सजले असून विमानतळावर मोठ्या प्रमाणावर बँडबाजा त्यांच्या स्वागतासाठी तैनात आहेत. शहरात देखील विविध ठिकाणी त्यांच्या लग्नाचे बॅनर्स पहायला मिळत आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)