Bhool Bhulaiyaa 3 Teaser Out: कार्तिक आर्यन पुन्हा एकदा दिसणार रुह बाबाच्या भूमिकेत; समोर आला 'भूल भुलैया 3' चा टीजर (Watch)

टीझरमध्ये कार्तिक आर्यन पुन्हा हॉन्टेड मॅन्शनमध्ये दिसत आहे. यादरम्यान त्याचा दमदार डायलॉगही ऐकायला मिळतो.

Bhool Bhulaiyaa 3 Teaser

कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. भूल भुलैया 2च्या अभूतपूर्व यशानंतर आता निर्मात्यांनी चित्रपटाचा तिसरा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती, मात्र आता भूल भुलैया 3 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर, अभिनेता कार्तिक आर्यनने चाहत्यांसह भूल भुलैया 3 चा टीझर शेअर करत, पुष्टी केली आहे की लवकरच प्रेक्षकांना भूल भुलैया 3 पाहायला मिळेल. साधारण 57 सेकंदांच्या टीझरमध्ये कार्तिक आर्यन पुन्हा हॉन्टेड मॅन्शनमध्ये दिसत आहे. यादरम्यान त्याचा दमदार डायलॉगही ऐकायला मिळतो. चित्रपटाचे दिग्दर्शन पुन्हा एकदा अनीस बज्मी यांच्याकडे देण्यात आले आहे. हा हॉरर कॉमेडी 2024 च्या दिवाळीत रिलीज होणार आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now