Athiya Shetty ने KL Rahul सोबत येत्या 3 महिन्यात विवाहबद्ध होण्याच्या बातम्यांवर दिली पहिली प्रतिक्रिया (View Post)
अथियाने इस्टाग्राम वर स्टेटस पोस्ट करत 'या तीन महिन्यात होणार्या लग्नात मला आमंत्रण असू दे' असं म्हणत वृत्ताचं खंडन केले आहे.
अभिनेत्री Athiya Shetty क्रिकेटर KL Rahul सोबत येत्या 3 महिन्यात विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सोशल मीडीयाच्या विविध प्लॅटफॉर्मवर फिरत आहे. मात्र त्याला दोन्ही कुटुंबाकडून दुजोरा देण्यात आला नव्हता. पण आज अथियाने यावर मौन सोडलं आहे. इस्टाग्राम वर स्टेटस पोस्ट करत 'या तीन महिन्यात होणार्या लग्नात मला आमंत्रण असू दे' असं म्हणत खोचक प्रतिक्रिया देत या वृत्ताचं सध्या खंडन केलं आहे.
अथिया शेट्टी ची इंस्टाग्राम स्टोरी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)