Asha Nadkarni Passes Away: जेष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आशा नाडकर्णी यांचा जन्म सारस्वत कॉलनीत राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आशा या एक उत्तम नृत्यांगनाही होती. साधारण 1957 ते 1973 पर्यंत आशा यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले.
जेष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. मुख्यत्वे मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणाऱ्या आशा यांनी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर येताच इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. यासोबत त्यांचे अनेक चाहते सोशल मिडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. आशा नाडकर्णी यांचा जन्म सारस्वत कॉलनीत राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आशा या एक उत्तम नृत्यांगनाही होती. साधारण 1957 ते 1973 पर्यंत आशा यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले. आशा यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. नवरंग (1959), गुरु और चेला (1973), चिराग (1969), फरिश्ता (1968), श्रीमानजी (1968), दिल और मोहब्बत (1968), अलबेला मस्ताना (1967), बेगुनाह (1970) अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)