Anupam Kher: आम्ही आधीच श्रीमंत असलेल्या परदेशी संस्थांना देणगी देतो - अनुपम खेर

काश्मिरी पंडितांच्या समस्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटाद्वारे आम्ही खूप कमावले आहे. आता त्यांना देण्याची गरज आहे

Anupam Kher

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. गेल्या वर्षी, अभिनेत्याच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यानंतर त्यांचा 'कार्तिकेय 2' चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

आज अभिनेता दिल्लीत आयोजित ग्लोबल काश्मिरी पंडित कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात ते सहभागी झाले आणि त्यांनी काश्मिरी लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केला.काश्मिरी पंडितांच्या समस्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटाद्वारे आम्ही खूप कमावले आहे.  तसेच आम्ही आधीच श्रीमंत असलेल्या परदेशी संस्थांना देणगी देतो. आता आपल्या प्रियजनांना दान करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी पाच लाखांची मदत काश्मिरी पंडितांना करत असल्याचे म्हटले.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now