Jigra Song Chal Kudiye: आलिया भट्ट स्टारर 'जिगरा' मधील 'चल कुडिये' हे गाणे रिलीज, चित्रपट 11 ऑक्टोबरला थिएटरमध्ये होणार दाखल
'जिगरा' हा चित्रपट 11 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. आलिया भट्टचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून हे गाणे रिलीज झाल्याने त्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
आलिया भट्टच्या आगामी 'जिगरा' चित्रपटातील 'चल कुडिये' हे पहिले गाणे रिलीज झाले असून, ते रिलीज होताच सोशल मीडियावर या गाण्याने खळबळ उडवून दिली आहे. या गाण्यात आलियाची ग्लॅमरस आणि दमदार शैली पाहायला मिळते. दिलजीत दोसांझने या गाण्याला आपला आवाज दिला असून, या गाण्यात एक खास जादू भरली आहे. 'चल कुडिये'चे संगीत दिग्दर्शन मनप्रीत सिंग यांनी केले आहे, तर गीते हरमनजीत सिंग यांनी लिहिली आहेत. या गाण्याचे संगीत आणि दिलजीतचा आवाज यांचा मिलाफ प्रेक्षकांना पसंत पडत आहे.
'जिगरा' हा चित्रपट 11 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. आलिया भट्टचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून हे गाणे रिलीज झाल्याने त्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)