Nikita Rawal Looted At Gun Point: अभिनेत्री निकिता रावलची लाखो रुपयांची लूट; नोकराने गळ्यावर चाकू ठेवून दिली धमकी, दोघांना अटक
अभिनेत्रीने या संदर्भात मुंबई पोलिसांकडे एफआयआर दाखल केला, त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली. दरोडेखोरांमध्ये निकिताच्या नोकराचाही समावेश आहे.
Nikita Rawal Looted At Gun Point: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री निकिता रावल (Nikita Rawal) सोबत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 'गरम मसाला' आणि 'ब्लॅक अँड व्हाईट' सारख्या चित्रपटात दिसलेल्या निकिताकडून बंदुकीच्या धाकावर साडेतीन लाख रुपये लुटण्यात आले. निकिताने सांगितले की, जेव्हा त्यांनी दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अभिनेत्रीने या संदर्भात मुंबई पोलिसांकडे एफआयआर दाखल केला, त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली. दरोडेखोरांमध्ये निकिताच्या नोकराचाही समावेश आहे. नोकराने गळ्यावर चाकू ठेवून अभिनेत्रीला धमकी दिली. या घटनेनंतर निकिताने मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)