अभिनेता Dharmendra यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; पाठदुखीच्या त्रासामुळे केले होते भरती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

धर्मेंद्र (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता धर्मेंद्र यांना शूटिंगदरम्यान पाठदुखीचा त्रास झाला होता, त्यानंतर त्यांना 4 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement