Ranveer Singh Case: न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा नोंदवला जबाब

गली बॉय अभिनेता सकाळी 7 च्या सुमारास चेंबूर पोलीस स्टेशनला पोहोचला आणि सकाळी 9 वाजता निघून गेला.

Ranveer Singh | (Photo Credits: Instagram)

न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा जबाब नोंदवला आहे. गली बॉय अभिनेता सकाळी 7 च्या सुमारास चेंबूर पोलीस स्टेशनला पोहोचला आणि सकाळी 9 वाजता निघून गेला. गरज भासल्यास तपास अधिकारी त्याला पुन्हा बोलावतील असे पोलिसांनी सांगितले. अभिनेत्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 292, 294 आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या 509 आणि 67 (A) अंतर्गत अश्लीलतेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)