Bigg Boss Marathi 5: संग्रामनंतर अरबाज पटेल बिग बॉसच्या घराबाहेर; निक्कीला अश्रू अनावर

काल बिग बॉसच्या घरातून अरबाज पटेलची एक्झिट झाली आहे. अरबाजच्या जाण्याने निक्की तांबोळी खूप भावूक झाली.

Photo Credit- Instagram

Bigg Boss Marathi 5: संग्राम चौगुले बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर या आठवड्यात घरात कोणतही एलिमिनेशन होणार नाही, असे अनेकांना वाटले होते. मात्र, काल बिग बॉसच्या घरातून अरबाज पटेलची एक्झिट झाली आहे. अरबाजच्या जाण्याने निक्की तांबोळी खूप भावूक झाली. तिला अश्रू अनावर झाले. 'शिकाऱ्याची बंदूक' कार्यात निक्की, जान्हवी, अरबाज (Arbaz Patel) , वर्षा उसगांवकर आणि सूरज हे ,सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यामध्ये आता अरबाजचा पत्ता कट झाला आहे. 'बिग बॉस मराठी' च्या घरात इतिहासात पहिल्यांदाच कॅप्टन झालेला सदस्याला घर सोडून जावे लागले आहे. अरबाज या आठवड्याचा कॅप्टन झाला होता. आता घराचा नवा कॅप्टन कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. (हेही वाचा: Bigg Boss Marathi 5: ‘घे पाऊल पुढे जरा’ गाण्यावर वर्षा उसगांवकर यांनी स्वप्निल जोशी आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्यासोबत केला डान्स (Watch Video))

अरबाज पटेल बिग बॉसच्या घराबाहेर

 

View this post on Instagram

 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement