भोजपुरी गायिका Nisha Upadhyay ला लागली गोळी; कार्यक्रमावेळी झाला गोळीबार, आरोपी फरार

या घटनेबाबत सांगितले जात आहे की, निशा उपाध्याय एका कार्यक्रमासाठी छपरा येथे आली होती. या ठिकाणी कार्यक्रमाच्या मध्यभागी स्थानिक लोकांनी आनंदाने गोळीबार सुरू केला. यादरम्यान निशाच्या पायाला गोळी लागली.

Nisha Upadhyay

भोजपुरी इंडस्ट्रीजची प्रख्यात भोजपुरी गायिका निशा उपाध्याय हिच्यावर छपरा येथील स्टेज शोदरम्यान गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी रात्री छपरा येथे एका स्टेज शोदरम्यान निशा हिच्यावर गोळीबार झाला होता, त्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक झाली होती. परिस्थिती पाहता निशाला पाटण्याला रेफर करण्यात आले. या घटनेबाबत सांगितले जात आहे की, निशा उपाध्याय एका कार्यक्रमासाठी छपरा येथे आली होती. या ठिकाणी कार्यक्रमाच्या मध्यभागी स्थानिक लोकांनी आनंदाने गोळीबार सुरू केला. यादरम्यान निशाच्या पायाला गोळी लागली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर गोळीबार करणारा व्यक्ती फरार झाला. डॉक्टरांनी निशा उपाध्यायवर शस्त्रक्रिया करून तिच्या पायातली गोळी काढल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांकडे या घटनेची कोणतीही माहिती नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement