Anant Radhika Engagement: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा अँटिलिया येथे दिमाखात पार पडला; पहा खास फोटोज

अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) चा साखरपुडा आज मुंबईतील अँटिलिया येथे दिमाखात पार पडला.

Anant Radhika Engagement (PC - ANI)

Anant Radhika Engagement: भारतातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) चा साखरपुडा आज मुंबईतील अँटिलिया येथे दिमाखात पार पडला. या निमित्ताने दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना अनेक भेटवस्तू आणि शुभेच्छा दिल्या. या दरम्यान गोल धना परंपरा आयोजित करण्यात आली आहे. गोल धना म्हणजे गूळ आणि धणे - जे गुजराती परंपरेत साखरपुडा समारंभात वापरले जातात. या वस्तू वराच्या घरी मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना वाटल्या जातात. वधूचे कुटुंब वराच्या घरी भेटवस्तू आणि मिठाई आणते. यानंतर दोघांमध्ये अंगठ्याची देवाणघेवाण होते. अंगठ्याची देवाणघेवाण केल्यानंतर, जोडपे त्यांच्या वडिलांकडून आशीर्वाद घेतात.

पहा खास फोटोज - 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement