Actor Brahma Mishra Passes Away: 'Mirzapur' फेम अभिनेता ब्रह्मा मिश्रा याचे निधन; वर्सोवा येथील राहत्या घरी आढळला मृतदेह
अभिनेत्री श्रिया पिळगावकर हीने देखील Divyenndu याने शेअर केलेल्या पोस्ट वर आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.
'मिर्झापूर' फेम 'ललित' अभिनेता ब्रह्मा मिश्रा याचे निधन झाले आहे. त्याचा सहकलाकार Divyenndu याने सोशल मीडीयात ब्रम्हा मिश्रा याला श्रद्धांजली अर्पण करत ही दु:खद बातमी शेअर केली आहे. दरम्यान ब्रह्मा मिश्रा याचा मृतदेह मुंबईमध्ये त्याच्या राहत्या घरी आढळला आहे. कूपर हॉस्पिटल मध्ये ब्रम्हा मिश्रा याचा मृतदेह ऑटोप्सी साठी पाठवण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)