‘Bhool Bhulaiyaa 3′ Trailer: 'भूल भुलैया 3'चा ट्रेलर रिलीज, हॉरर आणि कॉमेडीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
कार्तिक आर्यन-तृप्ती दिमरी यांचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3' च्या ट्रेलर प्रदर्शनाची प्रतीक्षा अखेर संपली. जयपूर येथे एका भव्य कार्यक्रमात चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच करण्यात आला.
‘Bhool Bhulaiyaa 3′ Trailer: भूल भुलैया 3 च्या निर्मात्यांनी अखेर कार्तिक आर्यन(Kartik Aaryan), तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर(Bhool Bhulaiyaa 3 TrailerOut ) लॉंच केला आहे. बुधवारी जयपूर येथे एका भव्य कार्यक्रमात चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच करण्यात आला. ट्रेलरची सुरुवात “हवेली” चे दरवाजे उघडण्यापासून होते. कार्तिक रूह बाबाच्या भूमीकेत दिसणार आहे. एक नाही तर दोन मंजुलिकांशी लढणार आहे. अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) त्याच्या प्रेमीकेच्या भूमिकेत दिसत आहे. राजपाल यादव आहे, जो छोटा पंडितच्या भूमीकेत आहे. 'भूल भुलैया 3' हा चित्रपट 2007 मध्ये आलेल्या फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. (हेही वाचा: Celebrity Hacker Hot List 2024: देशातील 'या' 10 सेलिब्रिटींच्या नावावर होत आहेत सर्वाधिक घोटाळे; McAfee ने जारी केली यादी, Orry, Diljit Dosanjh, Alia Bhatt चा समावेश)
'भूल भुलैया 3'चा ट्रेलर रिलीज
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2024 05:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

