IPL Auction 2025 Live

YouTuber ने लाइव स्ट्रीमिंगद्वारे दिलं दारू पिण्याचं चॅलेन्ज; 1.5 लिटर Vodka पिल्यानंतर 60 वर्षीय वृद्धाचा LIVE मृत्यू

युट्यूबरने त्याला पैशाच्या बदल्यात दारू किंवा गरम सॉस पिण्याचे आव्हान केले होते. रशियन मीडियाच्या वृत्तानुसार, दीड लिटर व्होडकाचे सेवन केल्यानंतर ही वृद्ध व्यक्ती खाली पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

Liquor | entational Image | (Photo Credits: Pixabay)

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, जोशमध्ये होश गमावल्यावर आपलचं नुकसान होतं. रशियामध्ये असाच प्रकार घडला आहे. एका 60 वर्षीय व्यक्तीने एका चॅन्लेजदरम्यान 1.5 लिटर Vodka (अल्कोहोल) प्याला. त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. या 60 वर्षांच्या या दिग्गज व्यक्तीने यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमिंगवेळी शक्य तेवढे मद्यपान करण्याचे आव्हान स्वीकारले आणि ते पूर्ण करण्यासाठी 1.5 लिटर व्होडका सेवन केला. त्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये त्याला दारू पिताना पाहात असलेले दर्शक त्याचा मृत्यू पाहून आश्चर्यचकित झाले.

दि इंडिपेंडेंटच्या वृत्तानुसार, 'दादाजी' म्हणून ओळखल्या जाणार्‍या रशियन व्यक्तीला युट्यूबरने चॅलेन्जसाठी पैशांची ऑफर दिली होती. या चॅलेन्जला 'थ्रॅश स्ट्रीम' किंवा ट्रॅश स्ट्रीम असं म्हटलं जातं. आजकाल सोशल मीडियावर हे चॅलेन्ज दिलं जात आहे. या आव्हानामध्ये एखाद्या व्यक्तीला पैशाच्या बदल्यात अपमानजनक कृत्य किंवा स्टंट करण्याचे आव्हान केले जाते. या आव्हानाचे लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जातं. यात मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आव्हान स्विकारतात. (वाचा - Man Surrounded By Snakes: अनेक धोकादायक सापांनी वेढलेल्या जागेत कॅमेऱ्यामध्ये बोलत राहिली व्यक्ती, अचानक... (See Viral Video)  )

लाईव्ह स्ट्रिमिंगमध्ये दारू पिऊन मृत्यू झालेल्या 60 वर्षीय व्यक्तीचं नाव युरी दुशकिन असं आहे. युट्यूबरने त्याला पैशाच्या बदल्यात दारू किंवा गरम सॉस पिण्याचे आव्हान केले होते. रशियन मीडियाच्या वृत्तानुसार, दीड लिटर व्होडकाचे सेवन केल्यानंतर ही वृद्ध व्यक्ती खाली पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार प्रेक्षकांना लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे पाहिला.

रशियन अधिका्यांनी गेल्या आठवड्यात स्मोलेन्स्क शहरात घडलेल्या घटनेचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, रशियन सिनेटचा सदस्य अलेक्सी पुष्कोव्ह यांनी सोशल मीडियावरील हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या घटनांवर बंदी घालण्यासाठी कायदा करण्याचा आग्रह धरला आहे.