Year Ender 2020: लहान मुलांच्या या '5' व्हिडिओजची सोशल मीडियावर धूम; पहा यावर्षी व्हायरल झालेले Cute Videos

समोर येणारे विविध व्हिडिओत लहान मुलांचा निरागसपणा आणि क्युटनेस अनेकांचे लक्ष वेधून घेतात. हे व्हिडिओज पाहून मोठ्यांचा ताण, तणाव अगदी चुकटीसरशी पळून जातो आणि युजर्स तासन् तास हे व्हिडिओज पाहु शकतात.

Cutest Babies on Internet in 2020 (Photo Credits: Kobe Instagram, @Anup20992699 Twitter)

इंटरनेटवर लहान मुलांच्या व्हिडिओजची धूम असते. समोर येणारे विविध व्हिडिओत लहान मुलांचा निरागसपणा आणि क्युटनेस अनेकांचे लक्ष वेधून घेतात. हे व्हिडिओज पाहून मोठ्यांचा ताण, तणाव अगदी चुकटीसरशी पळून जातो आणि युजर्स तासन् तास हे व्हिडिओज पाहु शकतात. यंदा कोविड-19 लॉकडाऊनमुळे लहान मुलांचे अनेक व्हिडिओज पाहायला मिळाले. लॉकडाऊनमुळे सर्वजण घरी असल्याने पालक आपल्या लहान मुलांचे व्हिडिओज काढून सोशल मीडियावर शेअर करत होते. आता हे वर्ष संपत आले आहे. तरी यावर्षी व्हायरल झालेल्या लहान मुलांच्या क्युट व्हिडिओजवर एक नजर टाकूया...

2020 मध्ये जगात खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी घडून आल्या. परंतु, 2020 मधील बेबी व्हिडिओज लोक पुन्हा पु्न्हा बघू इच्छितात. अशाच व्हिडिओजपैकी एका व्हिडिओमध्ये एका चर्चमधील फादर प्रार्थना करत असताना एक लहान मुलगी त्यांना हाय-फाय देऊन जाते. या व्हायरल झालेल्या व्हिडिओजपैकी काही लहान मुलांचे सोशल मीडिया अकाऊंट सुद्धा असून त्यांचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत. (कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये सारं काही बंद असल्याने वैतागलेल्या 4 वर्षांच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव, Watch Video)

थॅंक्यू मम्मा:

या व्हिडिओमधील मुलगा जगातील सर्वात छोटा नम्र मुलगा वाटतो. 2 वर्षीय ग्रे चे व्हिडिओ यावर्षी व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये जेव्हा ग्रे ची आई त्याला जेवण देते त्या प्रत्येक वेळेला विनम्रपणे आपल्या आईला थँक्यू म्हणतो.

हायफाय टू फादर:

या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी चर्चमध्ये प्रार्थना करत असलेल्या फादरला हायफाय देताना दिसत आहे. हा व्हिडिओ मुलीच्या आईने शूट करुन सोशल मीडियावर अपलोड केला असता तो जबरदस्त व्हायरल झाला.

जगातील सर्वात क्यूट शेफ:

Kobe नावाचा सर्वात लहान आणि क्यूट शेफ इंटरनेटवर खूपच व्हायरल आहे. हा छोटा शेफ खूप चविष्ट जेवण बनवतो. परंतु, त्याच्या क्यूटनेसमुळे तो इंटरनेटवर भलताच व्हायरल झाला आहे.

जोशी फॅमेली बॉय:

जोशी फॅमेलीचा हा व्हिडिओ वर्षाच्या सुरुवातीला व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सर्व फॅमेली मेंबर्स 'फुलो के रंग से' हे गाणे गात असताना लहान मुलगा जोरजोरात जावून सर्वांना मिठी मारत होता.

हेअरकट:

गेल्या महिन्यात या लहान मुलाचा केस कापतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. केस कापणाऱ्या न्हावीला हा मुलगा ओरडत असून धमकी देताना दिसत आहे.

2020 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे काही व्हिडिओज होते. यांसारखे अजून कित्येक व्हिडिओज तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. हे व्हिडिओज पाहून तुम्ही दैनंदिन जीवनातला स्ट्रेस विसरून जाल आणि आनंदी व्हाल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif