![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/05/image-1-1-380x214.jpg)
Woman Takes Nap in Overhead Compartment: साउथवेस्ट एअरलाइन्स(Southwest Airlines)च्या फ्लाइटमध्ये, एका महिलेने ओव्हरहेड बिन(Overhead Compartment)मध्ये झोपून (Woman Nap)प्रवास केल्याचे समोर आले आहे. महिला प्रवाशाला असे झोपलेले पाहून इतर प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रवासादरम्यान, सुटकेस ठेवण्याच्याजागेवर महिला झोपल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सामान्यतः सामान ठेण्यासाठी त्या जागेचा वापर होतो. मात्र त्या महिलेने त्या जागेचा झोपण्यासाठी वापर केल्याने तिला झोपण्यासाठी खाली जागा मिळाली नाही का? असा हस्यास्पद सवाल अनेकांकडून विचारला जात आहे. दरम्यान, खरी घटना अशी आहे की, थोडा काळ महिलेने तेथे विश्रांती घेतली. तिला फार काळ तेथे थांबता आले नाही. कारण एका फ्लाइट अटेंडंटने तिला टेकऑफच्या आधी खाली उतरवले. (हेही वाचा:Kolhapur Horse Carriage Race Accident: टांगा उलटल्याने अपघात; घोडागाडी शर्यत अंगाशी, दुचाकीस्वार जखमी (Watch Video) )
Passengers on a Southwest Airlines flight were shocked to see more than just bags in the overhead bins.https://t.co/vEKqBL8wa6 pic.twitter.com/aYjZ0gmbwU
— USA TODAY (@USATODAY) May 12, 2024