शरीरसुखाची मागणी करणाऱ्या तरुणाला महिलेने भररस्त्यात धुतले

महिलेने बँकेच्या व्यवस्थापकाला भररस्त्याच दांडुक्याने धुतले असल्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

फोटो सौजन्य - ANI

बंगळूरू मधील बँकेच्या व्यवस्थापकाने कर्ज मंजुरीसाठी  महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे या महिलेने बँकेच्या व्यवस्थापकाला भररस्त्याच दांडुक्याने धुतले असल्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

कर्नाटकातील दावणगेरे येथील एका बँकेमध्ये एक महिला कर्ज मंजुरासाठी गेली होती. त्यावेळी तिला कर्ज मंजुरीसाठी बँकेच्या व्यवस्थापकाकडे पाठविण्यात आले. मात्र या वेळी व्यवस्थापकाने कर्ज मंजुर करण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली. यामुळे ही महिला संतप्त झाली आणि व्यवस्थापकाला रस्त्याच दांडुकाने त्याला धुतले आहे. या व्हिडिओतील महिलेने कोणतीही भीती न बाळगता चोप देणे सुरु ठेवले. तर महिला चोप देत असताना व्यवस्थापक रस्त्यावरील लोकांना हाका मारत होता. परंतु त्याच्या मदतीसाठी कोणी पुढे आले नाही.

अखेर या व्यवस्थापकाने सर्वांसमोर या महिलेची माफी मागीतली आहे. तर समाजातील अशा विकृत व्यक्तींना अशीच अद्दल घडविल्या पाहिजे अशी मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif