हरियाणा मध्ये नोकरी वरून काढून टाकलेल्या महिलेचा शोले स्टाईल आत्महत्येचा प्रयत्न (Watch Video)
भारतीय सिनेमातील सुपरहिट सिनेमा शोले मधील वीरूचा सुसाईड सीन हा त्यावेळी प्रचंड गाजला होता, त्याचेच अनुकरण करून हरियाणामधील एका महिलेने आपली नोकरी वाचवण्यासाठी फिल्मी ड्रामा करत अधिकाऱ्यांना आत्महत्येची धमकी दिली.
बॉलिवूड (Bollywood) मधील माईलस्टोन म्हणून ओळखला जाणारा चित्रपट म्हणजे शोले (Sholay) . आजही या चित्रपटातील डायलॉग, दृश्य लोकांच्या स्मरणात ताजी आहेत. पण हरियाणा (Hariyana) मधील एका महिलेने सिनेमातल्या वीरूच्या सुसाईड सीनचे प्रत्यक्ष आयुष्यात अनुकरण केल्याचे समजत आहे. गुरुग्राम (Gurugram) येथे एका कंपनीतील कर्मचारी महिलेला नोकरी वरून काढून टाकल्याने तिने फिल्मी स्टाईलने आपल्या अधिकाऱ्यांना आत्महत्येची धमकी दिली. शोले चित्रपटात धर्मेंद्र (Dharmendra) टाकीवर चढून जसा सुसाईड सुसाईड ओरडत असतो अगदी तशाच अविर्भावात ही महिला आपल्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या गच्चीवर चढलेली पाहायला मिळत आहे. या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळतोय.
(Watch Video)
इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तानुसार गुरुग्राम मधील सायबर सिटी या परिसरात एका खाजगी ऑफिसमध्ये ही महिला काम करत होती पण तिला एकाएकी कामावरून काढून टाकल्याचे समजताच या महिलेला मोठा धक्का बसला त्यातून लगेच सावरू न शकल्याने तिने आपण काम करत असलेल्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या गच्चीवर जाऊन जीव देण्याचा विचार केला. त्याच दुःखाच्या आवेशात ही महिला गच्चीवर जात असल्याचे पाहून इतर कर्मचाऱ्यांना संशय आला त्यामुळे तिच्या पाठोपाठ ऑफिसमधील एक अधिकारी देखील गच्चीवर गेला. त्याला पाहताच या महिलेने कठड्याच्या कडेवर उभे राहून आपण खाली उडी मारून जीव देऊ अशी धमकी द्यायला सुरवात केली. त्यानंतर अचानक ती खाली बसून त्या अधिकाऱ्याशी नोकरीवर ठेवण्याच्या बाबत मांडवली करायला लागली.सोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
दरम्यान, कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन या महिलेला कठड्यावरून खाली उतरायला सांगितले पण कोणालाच न जुमानता ही महिला नोकरीवरून न काढण्याची मागणी करत होती, अखेरीस कंपनीने ही मागणी मेनी करण्याचे आश्वासन दिल्यावर ही प्रतापी महिला खाली उतरायला तयार झाली.