दुर्मिळ Black Leopard पुन्हा दिसला ताडोबा नॅशनल पार्क मध्ये; वाईल्ड फोटोग्राफर Anurag Gawande ने टिपलेल्या फोटोंनी नेटकरी पुन्हा थक्क!
त्यांच्यामध्ये असलेल्या पिगमेंटेशन मुळे त्याच्या त्वचेचा रंग, पोअर आणि कोट्स हे काळे होतात. असे दुर्मिळ प्राणी अनेकदा दिसल्यास शिकार्यांची शिकार बनून जातात.
वाइल्ड लाईफ फोटोग्राफर अनुराग गावंडेने पुन्हा दुर्मिळ ब्लॅड लेपर्ड ला कॅमेर्यात कैद करत त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून नेटकर्यांना थक्क केले आहे. अनुराग हा अवघ्या 24 वर्षांचा फोटोग्राफर आहे. पण त्याने नागपूर मध्ये ताडोबाच्या जंगलात दोनदा दुर्मिळ अशा काळ्या बिबट्याला कॅमेर्यामध्ये कैद केले आहे. सध्या सोशल मीडियात त्याच्या फोटोजमुळे अनेक जण या काळ्या बिबट्याचं रूप पाहून आवाक झाले आहे. Black Panther च्या अंगावरही दिसतात स्पॉट्स? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ब्लॅक पॅंथरच्या फोटो व्हायरल मध्ये दिसली दुर्मिळ झलक!
अनुरागने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या दोन फोटोजमध्ये तो रस्त्या क्रॉस करताना टिपला गेला आहे. तर एका फोटोमध्ये नजर रोखून पाहणार्या बिबट्याचा फोटो शेअर करताना त्याने 'भीती' म्हणजे काय असते? हे तुम्हांला हा फोटो पाहून कळेल अशा आशयाचं कॅप्शन देत अनुरागने फोटो फोटो शेअर केले आहेत. मागील वर्षीदेखील एका हरणाचा पाठलाग करणार्या बिबट्याचा फोटो शेअर केला होता. तर आता 2 वर्षांनंतर अनुरागने त्याच्या फोटोग्राफी सीरीज मध्ये काही फोटोग्राफीत टिपण्यात काहीसे कठीण शॉर्ट्स शेअर करत नेटकर्यांना अचंबित केलं आहे.
ताडोब्यात दिसलेला दुर्मिळ Black Leopard
ब्लॅक लेपर्ड हे अतिशय दुर्मिळ आहेत. त्याताही काळ्या रंगाचे स्पॉट असलेले बिबटे पहायला मिळणं हे त्यातही दुर्मिळ आहे. असे melanistic लेपर्ड हे एकूण बिबट्यांमध्ये 11% आहेत. त्यांच्यामध्ये असलेल्या पिगमेंटेशन मुळे त्याच्या त्वचेचा रंग, पोअर आणि कोट्स हे काळे होतात. असे दुर्मिळ प्राणी अनेकदा दिसल्यास शिकार्यांची शिकार बनून जातात. पण अनुरागला जेव्हा हा दुर्मिळ प्राणी दिसला त्याने त्याला कॅमेर्यात टिपलं आहे.
दरम्यान डेली मेलला माहिती देताना अनुराग म्हणाला, 'जेव्हा ब्लॅक लेपर्ड समोर असल्याचं लक्षात आलं तेव्हा आम्ही लगेजच गाडी थांबवली. ही माझी त्याला असं पाहण्याची दुसरी वेळ होती. हा अनुभव थक्क करणारा आहे. त्यामुळे त्याच्यापासून थोडी दूरच गाडी ठेवून आम्ही फोटो टिपले आहेत.'