#WomenSupportingWomen: जगभरातील महिला ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट करण्यामागे फक्त ट्रेंड नाही तर आहे 'हे' कारण

Women Supporting Women (Photo Credits: File Image)

मागील काही दिवसांपासून अनेक महिला इंस्टाग्राम, फेसबुक सहित सोशल मीडियावर ब्लॅक आणि व्हाईट मोनोक्रोम मध्ये फोटो पोस्ट करत आहेत. तुम्हालाही असे अनेक मॅसेज आले असतील, ज्यात असे चॅलेंज करून फोटो पोस्ट करायला सांगितला जात असेल. WomenSupportingWomen अशा हॅशटॅग सह हे फोटो पोस्ट केले जात आहेत, आता हा नेहमीप्रमाणेच एखादा ट्रेंड आहे की यामागे काही अर्थ आहे याच्या कुतूहलापोटी आम्ही थोडा रिसर्च केला असता काही महत्वाची माहिती समोर आली आहे. न्यू यॉर्क टाइम्सच्या माहितीनुसार हा ट्रेंड साधारण एक ते दीड आठवड्याच्या आधी सुरु झाला आहे. ब्राझीलच्या च्या पत्रकार Ana Paula Padro यांनी हा ट्रेंड सुरु केला होता. यामागे जगभरात महिलांनी महिलांसाठी पुढाकार घेऊन पाठिंबा द्यावा अशी भावना आहे. सोशल मीडिया Influencers च्या माहितीनुसार, यामागे जगभरात महिलांच्या विरुद्ध घडलेल्या अन्यायाची काही उदाहरणे आहेत ज्याबाबत या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय पत्रकार फे डिसुझा यांनी या संदर्भात इंस्टाग्राम पोस्ट मधून माहिती दिली, अभ्यासानुसार टर्की मध्ये 15 ते 60 या वयोगटातील 45 टक्के महिला या घरगुती हिंसाचाराला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत स्वतः देशाच्या राष्ट्रपतीं कडूनही महिला या पुरुषांच्या बरोबरीच्या नसल्याचे म्हंटले जात आहे. तर माजी पंतप्रधान Binali Yidirim यांनी सुद्धा महिलांनी सार्वजनिक ठिकाणी शॉर्ट्स घातल्यावर शारीरिक अत्याचार करण्यापेक्षा त्यांना कठोर शब्दात समज द्या असे वादग्रस्त विधान केले होते.

फे डिसुझा पोस्ट

 

View this post on Instagram

 

Women must support women. Men must support women. Both must support trans people.

A post shared by Faye DSouza (@fayedsouza) on

दरम्यान, महिलांवरील अन्यायाची पहिली घटना म्हणजे, काही दिवसांपूर्वी अमेरिकन प्रतिनिधी Alexandria Ocasio यांनी संसदेत आपल्याला Fu***ng Bitch असे म्हण्टलेल्या एका पुरुष सहकाऱ्याचा विरोध करत जोरदार भाषण केलं होतं. तर दुसरीकडे तुर्कीस्तान मध्ये एका 27 वर्षीय महिलेचा तिच्या बॉयफ्रेंड कडून खून झाल्याची घटना घडली होती, यात मुख्य म्हणजे तुर्की सरकार वर महिलांच्या संरक्षणसंबधित कायद्यात चुकीचे बदल केले जात असल्याचा आरोप लगावला जात आहे.

या सगळ्याच्या विरुद्ध महिलांना लढण्याचा पाठिंबा मिळावा यासाठी हा #WomenSupportingWomen चॅलेंज मधून पुढाकार घेतल्याचे फे डिसुझा यांनी म्हंटले आहे.



संबंधित बातम्या

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

IND W Beat WI W 1st T20I Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी केला पराभव, तीतास साधूची प्राणघातक गोलंदाजी

IND W vs WI W, 1st T20I Match Scorecard: पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला 196 धावांचे मोठे लक्ष्य, जेमिमाह रॉड्रिग्स आणि स्मृती मानधना यांची शानदार अर्धशतके

India Women vs West Indies Women, 1st T20I Match Live Toss Update: वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग XI