Gigantic Pythons Viral Video: भलेमोठे दोन अजगर आणि त्यांची शेपटी ओढणारा माणूस (पाहा व्हिडिओ)
अन् त्यातच जर अजगर (Pythons म्हटले तर? अनेकांच्या काळजाचे पाणी पाणी होऊ शकते. पण, ही बाब केवळ साप अथवा अजगरांना घाबरणाऱ्या व्यक्तीबद्दल होऊ शकेल. पण जो लोक साप, अजगरांसोबत खेळतात. त्यांच्याबद्दल काय म्हणाल? तुम्ही व्हिडिओच पाहा. मग तुम्हाला कळेल.
Viral Video of Pythons: साप म्हटले की अनेकांच्या अंगावर काटा येतो. अन् त्यातच जर अजगर (Pythons म्हटले तर? अनेकांच्या काळजाचे पाणी पाणी होऊ शकते. पण, ही बाब केवळ साप अथवा अजगरांना घाबरणाऱ्या व्यक्तीबद्दल होऊ शकेल. पण जो लोक साप, अजगरांसोबत खेळतात. त्यांच्याबद्दल काय म्हणाल? तुम्ही व्हिडिओच पाहा. मग तुम्हाला कळेल. आम्ही काय म्हणतो आहोत.होय, इथे आम्ही जो व्हिडिओ शेअर केला आहे तो पाहून अनेकांना धक्का बसू शकतो. त्यामुळे पाहणाऱ्यांनी व्हिडिओ आपल्या जबाबदारीवरच पाहावा असे आम्ही सूचवतो.
खरे तर हा व्हिडिओ एका प्राणीसंग्रहालयातील असल्याचे सांगितले जात आहे. jayprehistoricpets नावाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात एक व्यक्ती अगदी साधेपणाने दोन भल्यामोठ्या अजगरांचे शेपूट पकडताना पाहायला मिळतो. या व्यक्तीचे नाव जे ब्रेवर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून, व्हिडिओला जवळपास 3 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत आणि हा आकडा सातत्याने वाढत आहे. नेटिझन्सनी टिप्पणी विभागात मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया देताना एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, अजगरांशी मस्ती करताना आपल्याला जराही भीती वाटत नाही काय? दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, व्हिडिओ पाहूनच लक्षात येते की, अजगर किती चपळ आहेत. तिसऱ्या वापरकर्त्याने काहीशा काळजीयुक्त स्वरात म्हटले की, अरे बापरे! किती मोठे आणि भयानक अजगर. त्यांच्यापासून जपूनच राहिलेले बरे.
अजगर हा सापांचीच एक प्रजात आहे. जे आकाराने लांब , जाड आणि शक्तिशाली स्नायूंसाठी ओळखले जातात. ते मांसाहारी आहेत आणि उंदीर, पक्षी आणि इतर सापांसह विविध प्रकारचे प्राणी खातात. अजगर साप त्यांचे अत्यंत लवचिक जबडे आणि विस्तारित पोटामुळे त्यांचे शिकार पूर्ण गिळण्यास सक्षम असतात. जंगलात, पायथन साप हे एकटे प्राणी आहेत आणि बहुतेक रात्री सक्रिय असतात. दिवसा, आश्रयस्थानात लपलेले आढळतात. काही ठिकाणी त्यांचा दिवासाचाही वावर पाहायला मिळतो. अजगर सापांच्या काही प्रजाती अर्ध-जलचर देखील आहेत आणि ते नद्या आणि दलदल यांसारख्या पाण्याच्या स्त्रोतांजवळ आढळू शकतात.
व्हिडिओ
साप हे मानवांसाठी फार पूर्वीपासून आकर्षणाचा विषय राहिले आहेत, त्यांच्या आकारमानामुळे आणि सामर्थ्याने ते भयानक आणि विस्मयकारक बनतात. काही संस्कृतींमध्ये, अजगर सापांची देव म्हणून पूजा केली जाते, काही लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्याकडे गूढ शक्ती आहेत.