Viral Video: ट्रेडमिलवर धावताना 'बोले चुडियां' गाण्यावर तरुणाचा डान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यात तुम्ही एका तरुणाला चक्क सुरु असलेल्या ट्रेडमीलवर डान्स करताना पाहू शकता. हा डान्सही त्याने 'बोले चुडीया.. बोले कंगना' (Bole Chudiya Song) गाण्यावर केला आहे.
नृत्य (Dance ) हा कलेचाच एक अविष्कार. कोण तो छंद म्हणून जोपासतो, कोण आवड तर कोण आपला व्यवसाय. कोणताही छंद हा तुमच्या संस्कृतीचाच एक भाग असतो. अर्थात तो काही गोष्टींमध्ये कमी अधिक असतो इतकेच. अशा अनेकांच्या छंदाचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतात. हे व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनावरचे ताण-तणाव कमीही होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यात तुम्ही एका तरुणाला चक्क सुरु असलेल्या ट्रेडमीलवर डान्स करताना पाहू शकता. हा डान्सही त्याने 'बोले चुडीया.. बोले कंगना' (Bole Chudiya Song) गाण्यावर केला आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक तरुण 'कभी खुशी कभी गम' या बॉलिवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे. आलोक शर्मा या इंस्टाग्राम युजरने हा व्हिडिओ 18 ऑक्टोबर रोजी पोस्ट केला होता. जो आता व्हायरल झाला आहे. नाचणाऱ्या तरुणाचे गाण्याच्या बोलांवर बारीक लक्ष आहे. गाण्याचे बोल जसे आहेत त्यानुसार हा तरुण आपल्या स्टेप्स आणि हावभाव करताना दिसतो. (हेही वाचा, VIDEO: बाजारात रील बनवत होती तरुणी, मागून आलेल्या व्यक्तीने अचानक केले धक्कादायक कृत्य, व्हिडिओ झाला व्हायरल)
व्हायरल व्हिडिओ
View this post on Instagram
एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यात तुम्ही एका तरुणाला चक्क सुरु असलेल्या ट्रेडमीलवर डान्स करताना पाहू शकता. हा डान्सही त्याने 'बोले चुडीया.. बोले कंगना' (Bole Chudiya Song) गाण्यावर केला आहे.
मूळ गाण्याचा व्हिडिओ
इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यापासून या व्हिडिओला अनेक लाइक्स आणि टिप्पण्यांसह 37,000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एका युजरने या व्हिडिओला टिप्पणी देत "उत्कृष्ट" म्हटले आहे. तर दुसऱ्या युजर्सने लिहीले आहे. "Wowwwwwwww." आणखी एका यूजरने लिहिले, 'व्वा तो काय डान्स करतो आहे.'
बोले चुडिया हे गाणे लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे आणि ते सोनू निगम, अलका याज्ञिक, अमित कुमार, उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायले आहे. हे गाणे फराह खानने कोरिओग्राफ केले होते. या मल्टीस्टारर चित्रपटात शाहरुख खान, काजोल, करीना कपूर, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे मातब्बर कलाकार आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Oct 22, 2022 02:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

