घोड्याला नाही आवडला महिलेचा अचरट डान्स; दिली शिक्षा, घडली जन्माची अद्दल (व्हिडिओ)
अवघ्या १० सेंकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर काय काय व्हायरल होईल आणि कशा कशाला प्रसिद्धी मिळेल सांगताच येत नाही. एक व्हिडिओ व्हायरल झला आहे. ज्यात एक महिला चक्क घोड्यावर उभा राहून डान्स करताना दिसते. पण, तिचा हा अचरटपणा घोड्याला मुळीच आवडला नाही. त्यामुळे चिडलेल्या घोड्याने तिच्यासोबत जे काही केले ते पाहून तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल. नुसते आश्चर्यच व्यक्त करणार नाही. तर, हा व्हिडिओही पुन्हा पुन्हा पाहाल.
हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहा. यात एक महिला घोड्याच्या पाठीवर चढून नाचताना दिसते. कोणत्याही प्राण्याशी अमानुशपणे वर्तन करणे याचे लेटेस्ट ली समर्थन करत नाही. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आम्ही तो आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर, ही महिला घोड्यावर उभा राहून नाचते खरी. पण, अचानक तिच्या मनात काय येते कुणास ठाऊक. ती चक्क उडी मारून घोड्याच्या पाठीवर बसते. शेवटी प्राणीच तो. कदाचीत त्या घोड्याला या महिलेचे वर्तन आवडले नसावे. महिलेने उडी मारताच घोडा पुढे सरकतो. झाले. पुढे जे काही घडते ते व्हिडिओतच पाहा... (हेही वाचा, शरीरसुखाची मागणी करणाऱ्या तरुणाला महिलेने भररस्त्यात धुतले)
व्हिडिओतील महिलेची एकूण वेशभषा पाहाता ती महिला राजस्थानातील असावी असे दिसते. अवघ्या १० सेंकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. पण, अनेकांनी हा व्हिडिओ फेसबुक, ट्विटर, सोशल मीडियावर शेअर केला आहे. आतपर्यंत हा व्हिडिओ २०हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. पाचशेहून अधिक लोकांनी व्हायरल केला आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.